संत सावता महाराजांचे वंशज वसेकर महाराजांना आ.रोहित पवारांनी दिली नवी कोरी गाडी

संत सावता महाराजांचे वंशज वसेकर महाराजांना आ.रोहित पवारांनी दिली नवी कोरी गाडी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सोशल नेटवर्किंगवर ते प्रचंड सक्रीय असल्याने अनेकदा ते आपल्या कामांसंदर्भात यावरुन आपल्या फॉलोअर्सचा माहिती देत असतात. नुकतीच त्यांनी अशीच एक महिती आपल्या चाहत्यांना दिलीय. संत शिरोमणी श्री सावता महाराजांची शिकवण, कार्य आणि विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांना रोहित पवार यांनी एक गाडी घेऊन दिलीय. संत शिरोमणी श्री सावता महाराजांची शिकवण, कार्य आणि विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी रमेश महाराज वसेकर यांना राज्यभर प्रवास करावा लागतो. याचसाठी ही गाडी घेऊन देण्यात आलीय. मध्यंतरी रमेश महाराज वसेकर आणि रोहित पवार यांची सोलापूर जिल्ह्यातील अरण इथं भेट झाली होती. त्यावेळी रमेश महाराजांकडे असणाऱ्या वाहनाने त्यांना प्रवास करणं कठीण होत असल्याची माहिती रोहित पवार यांना मिळाली. यावेळी रोहित यांनी रमेश महाराज वसेकर यांना नवीन गाडी देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार कर्जत जामखेड मतदारसंघासाठीच्या निधीच्या माध्यमातून रमेश महाराज वसेकर यांना रोहित यांनी रविवारी नवीन गाडी देऊन दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post