अमानुषता...दहा वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

अमानुषता...दहा वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या   नगर- नेवासा तालुक्यातील वरखेड येथे एका दहा वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली. मंगळवारी रामडोह रस्त्याच्या पाटचारी परिसरात डोके छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती समजताच नेवासे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, आपल्या आईसह सावत्र वडिलांकडे राहून पोटाची भूक भागविण्यासाठी दारोदारी भाकरी मागणार्‍या या निष्पाप बालकाची इतकी निर्घृण हत्या बाहेरील कोण करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून लवकरच गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या जातील असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.  बारकू (टोपणनाव) समाधान फुलारे (वय 10, राहणार बुलढाणा, हल्ली वरखेड, ता. नेवासे) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे.


माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनस्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post