दिल्लीत मोठ्या घडामोडी, 4 केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे

दिल्लीत मोठ्या घडामोडी, 4 केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सांयकाळी होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असेल. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगारमंत्री संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे.  आज  सकाळी सकाळीच नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पाटील-राणे कधीही महाराष्ट्रात कोणत्याही प्रश्नावर एकत्र आले नव्हते. आज दोघेही मोदींच्या भेटीला गेले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची मंत्रिपदे फिक्स झाल्याची जोरदार चर्चा आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मोदींशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी हे दोन्ही नेते मोदींच्या निवासस्थानी आल्याची चर्चाही दिल्लीच्या वर्तुळात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post