तिसर्‍या लाटेची चाहूल...देशात सलग दुसर्‍या दिवशी रूग्णवाढ

तिसर्‍या लाटेची चाहूल...देशात सलग दुसर्‍या दिवशी रूग्णवाढ नवी दिल्ली - देशात कोरोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा वेग घेताना दिसत आहे. मंगळवारी चार महिन्यांनंतर सर्वात कमी 31,443 नवे रुग्ण आढळले होते. मात्र, यानंतर पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या रुग्णवाढीला तिसऱ्या लाटेशी जोडून पाहिले जात आहे.

देशात गुरुवारी गेल्या 24 तासांत 41,854 नवे कोरोना बाधित आढळले, तर 580 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी देशात 38,792 नवे कोरोनना बाधित रुग्ण समोर आले होते, तर 624 जणांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला होता. 

मागील एक महिना 7 ते 8 हजारच्या घरात रुग्ण दररोज वाढत आहेत. राज्यातील 93 टक्के रुग्ण 10 जिल्ह्यांत आहेत. उर्वरित 26 जिल्ह्यांमध्ये केवळ ८ टक्के रुग्ण आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर नाशिक, नगर, रायगड येथील रुग्णसंख्या वाढत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post