राघवेंद्र स्वामी विद्यानिकेतन व देवेंद्रनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 राघवेंद्र स्वामी विद्यानिकेतन व देवेंद्रनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  गुरुपौर्णिमा उत्साहात साजरीबोल्हेगाव येथील श्री.नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट संचलित श्री.राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतन व श्री.देवेन्द्रनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार व नगरसेवक मदन आढाव त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ब्रांच मॅनेजर अभिनव कुमार व अनुश तोमर हे उपस्थित होते.कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यालय आणि हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला होता. यावेळी सरस्वती व सद्गुरू देवेंद्रनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रोजेक्टर वरती सर्व मुले ऑनलाइन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष बाबूराव खालकर व सचिव भाग्यश्री फोडकर यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले.यावेळी आषाढी एकादशी निमित्त झालेल्या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यामध्ये शिवम कचरे,शौर्य कोरडे,निहारिका सिंग,आराध्या सोमवंशी,आदित्य पठाडे,तन्वी कचरे,मृण्मयी ठोंबे,शिवम

मनेळ,वैष्णवी आवारे,भाग्यश्री बिराजदार,अन्विता रावते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन आढाव यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये आपल्या गुरु चे महत्व विविध उदाहरणांद्वारे समजावून सांगितले. कार्यक्रमासाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनुक्रमे अमोल शिंदे व किशोर डाके त्याचबरोबर शुभांगी नायर,किरण डहाने,वंदना पूरनाळे,वैशाली अकोलकर,उमेश भोईटे,गणेश राजदेव,प्रवीणकुमार भोसले,चैताली कुलकर्णी यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे नियोजन सेन्ट मोनिका अध्यापक विद्यालयाच्या छात्राध्यापिका यांनी केले.सूत्रसंचालन किरण वाघमारे प्रास्ताविक सारिका बोरुडे व आभार प्रदर्शन सुप्रिया बोंदाडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहिणी पाटोळी रोहिणी भोसले व अर्चना त्रिभुवन यांनी विशेष प्रयत्न केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post