डाक विभागाच्या सेवा लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करणार-नूतन प्रवर अधिक्षक :रामकृष्ण एस

 डाक विभागाच्या सेवा लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करणार..

नूतन प्रवर अधिक्षक :रामकृष्ण एसअहमदनगर: अहमदनगर डाक विभागाचे नूतन प्रवर अधिक्षक डाकघर म्हणून श्री रामकृष्ण एस यांनी पदभार स्वीकारला.त्यानिमित्त नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज अहमदनगर च्या वतीने त्याचे स्वागत संघटनेचे जेष्ठ नेते श्री संतोष यादव केले.

श्री रामकृष्ण  एस हे एलरू विजयवाडा आंध्रप्रदेश येथे सहायक अधिक्षक डाकघर येथे कार्यरत होते, मागील 3 वर्षांपूर्वी श्री रामकृष्ण हे प्रमोशनवर अहमदनगर येथे सिनियर पोस्टमास्तर येथे आले होते काही काळ येथे काम केल्यानंतर अधिक्षक डाकघर श्रीरामपूर येथे त्याची पोस्टिग झाली, श्रीरामपूर येथे 2 वर्ष कामकाज केल्यानंतर पुन्हा अहमदनगर येथे प्रवर अधिक्षक डाकघर येथे त्याची प्रमोशनसाठी पोस्टिग झाली.

श्री एस रामकृष्ण हे अभ्यासु,शिस्त प्रिय अधिकारी म्हणून त्याची ओळख आहे.

त्याचे अहमदनगर येथे त्याचे स्वागत संघटनेचे जेष्ठ नेते श्री संतोष यादव यांनी त्याचे स्वागत केले.

यावेळी बोलताना श्री रामकृष्ण म्हणाले की डाक विभागाच्या लोकप्रिय सेवा अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करू, हे करत असताना आपले अनमोल सहकार्य अपेक्षित असून ,कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण निश्चित प्राधान्य देऊ.

 याप्रसंगी शसंघटनेचे विभागीय सचिव श्री संदीप कोकाटे,श्री शिवाजी जावळे,श्री नामदेव डेंगळे,श्री प्रकाश कदम,श्री सागर पंचारिया,श्री दीपक नागपुरे, श्री कमलेश मिरगणे,श्री नितिन थोरवे, श्री विजय चाबुकस्वार, अनिल धनावत, श्री दिपक कुंभारे इ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post