राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या

 राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोलापुरात शिवसैनिकाची हत्या



सोलापूर : नगरपरिषदेच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये समोर आली आहे. बाईकने जाणाऱ्या दोघा शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घालण्यात आला, यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. या प्रकरणी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.

बाईकवर डबल सीट जाणाऱ्या शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घालण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा मोहोळ शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाच्या जवळ ही घटना घडली. सतीश नारायण क्षीरसागर असे हत्या झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. तर दुचाकीवरील विजय सरवदे जखमी झाले आहेत.

या प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अनिल फडतरे, पिंटू सुरवसे, टेम्पो चालक भैय्या अस्वले या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी टेम्पो चालक भैय्या अस्वले याला पोलिसांकडून अटक झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post