10 लाखांची लाच...पोलिस कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळयात...

10 लाखांची लाच...पोलिस कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळयात...

 


दहा लाख रुपयांची लाचप्रकरणी परभणीच्या सेलू उप विभागीय कार्यालयातील पोलीस शिपायाला मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने अटक केली. गणेश चव्हाण असे त्या पोलिसांचे नाव आहे. तर दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाल यांच्यावर आरोप आहे.

तक्रारदार हे परभणी येथील रहिवासी आहेत. त्याच्या मित्राचा मे महिन्यात अपघाती मृत्यू झाला होता. अपघाती मृत्यूप्रकरणी सेलू पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला. या तपासादरम्यान मृत व्यक्तीच्या पत्नीसोबत तक्रारदारांचे मोबाईलवर झालेले संभाषण व्हायरल झाले होते. त्याची दखल घेऊन राजेंद्र पाल यांनी तक्रारदार याना चौकशीसाठी बोलावले होते. तुझी व्हायरल क्लिप मी ऐकली आहे. त्यातून जर बाहेर पडायचे असल्यास दोन कोटी रुपये द्यावे लागतील असे तक्रारदारांना सांगण्यात आले. लाच द्यायची नसल्याने तक्रारदारांनी मुंबई एसीबीकडे पाल यांच्या विरोधात तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी परभणी येथील उप विभागीय कार्यालयात सापळा रचून चव्हाणला एसीबीने रंगेहाथ पकडले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post