स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, नोटीफिकेशन जारी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, नोटीफिकेशन जारी नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी  मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. एसबीआयने 5 जुलै रोजी अप्रेरेंटिस पदाच्या भरतीसाठी एक नोटीफिकेशन जारी केलं आहे. यासाठीच रजिस्ट्रेशन हे 6 जुलैपासून म्हणजेच आजपासून सुरू झालं आहे. योग्य आणि इच्छूक उमेदवार 26 जुलै 2021 पर्यंत वेबसाईटवर जाऊन यासाठी अर्ज करू शकतात. देशभरातील विविध बँकांमध्ये अप्रेरेंटिससाठी जवळपास 6100 पद उपलब्ध आहे. 


महत्त्वाच्या तारखा


अर्ज करण्याची तारीख - 6 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2021


जागा एकूण - 6100


वयोमर्यादा

उमेदवाराचं वय हे 20 ते 28 वर्षांमधील असणं गरजेचं आहे. 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून, संस्थानातून ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली पाहिजे. 

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा यावर केली जाणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post