रुलर अर्बन योजने अंतर्गत येणारी कामे आदर्शवत करा

 अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील रुलर अर्बन योजने अंतर्गत येणारी कामे आदर्शवत करा - खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील(पाथर्डी, दि०७)  केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून शहरी चेहरा-मोहरा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात मध्ये या योजनेचे सुरुवात करण्यात आली होती.  भारतामध्ये काही मोजक्या लोकसभा मतदारसंघात दोन पेक्षा जास्त क्लस्टर देण्यात आले. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये तीन क्लस्टर देण्यात आले असून या प्रत्येकी क्लस्टर साठी 15 कोटी याप्रमाणे 45 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र अतिशय चांगल्या योजनेबाबत प्रशासकीय दिरंगाई व योजनेचे अर्धवट माहिती मुळे प्रशासनाकडून वर्क ऑर्डर देण्यात आल्या नव्हत्या. वर्क ऑर्डर देण्यात  न देण्यात आल्याने कामाची सुरुवात च झाली नव्हती.  मात्र केलेल्या पाठपुराव्यामुळे व योजनांची सविस्तर माहिती प्रशासनाला दिल्यानंतर गती मिळेल अशी अपेक्षा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. पाथर्डी येथील तिसगाव क्लस्टर अंतर्गत केंद्र सरकारच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी  रुलर अर्बन अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

 प्रसंगी पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे,  माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, तिसगाव ग्रामपंचायतीचे सरपंच काशिनाथ  लवांडे, ग्रामपंचायत सदस्य ,जिल्हा परिषद ब्लॉक डेव्हलपमेंट गटविकास अधिकारी झेंडे मॅडम तसेच कासार पिंपळगाव, मढि, निवडूंगे, शिरापुर, गेवराई, कवडगाव, उमरखेड, तिसगाव आदि गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

 यावेळी बोलताना खासदार डॉक्टर विखे पाटील म्हणाले की,   रुलर अर्बन योजनेतील अडथळे लवकरात लवकर दूर करून त्यासंबंधीच्या प्रशासकीय मान्यता घेऊन क काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे  .  सर्व क्लस्टर मधील विविध योजनांचे भूमिपूजन केंद्रीय कृषिमंत्री केंद्रीय कृषी तथा ग्रामविकास मंत्री तोमर  यांच्या हस्ते 12 जुलै दुपारी 11,30 वाजता करण्याचे योजले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post