राज्य संकटात असताना ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी काळी जादू !

 

राज्य संकटात असताना ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी काळी जादू! भाजप नेते नितेश राणेंचा गंभीर आरोपमुंबई: राज्यात सुरू असलेल्या संकटाच्या मालिकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळा जादू चालत असल्याचं आम्ही ऐकतोय, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

 चिपळूण, महाड, कोल्हापूर आणि सांगलीला पुराने वेढा घातला आहे. त्यामुळे हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. महाराष्ट्रावर एकामागून एक संकटाची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी खोचक ट्विट करतानाच मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोपही केला आहे.

स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी काळा जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो. तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post