मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही, त्यांचं मन एवढं मोठं नाही

मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही, त्यांचं मन एवढं मोठं नाही मुंबई - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी सायंकाळी पार पडला. त्यात महाराष्ट्रातून 4 खासदारांना मंत्रीपद देण्यात आले. त्यात भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राणेंच्या मंत्रीपदावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर, आता नारायण राणेंनी संजय राऊतांना प्रत्त्युत्तर दिलं आहे. तसेच, शरद पवार यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्याचेही त्यांनी सांगितले. 'शरद पवार यांनी मला फोन केला, चांगलं काम करा, असे ते म्हणाले. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. कारण त्यांचं मन एवढं मोठं नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही. मात्र, महाराष्ट्रातील सर्व विभागातून मला शुभेच्छा मिळाल्या, त्याच मी त्यांच्या वतीने शुभेच्छा समजतो, असेही नारायण राणेंनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post