मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…

 नवी दिल्ली: ‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’ असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. एका छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राणे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आज सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. 43 मंत्र्यांच्या यादीत नारायण राणे यांचं नाव सर्वात वर होतं. त्यामुळे त्यांनी पहिली शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post