नगर शहरात बालकांना न्युमोकोकल कॉन्जुगेट लसीकरण

 मनपाच्यावतीने बालकांना न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन लसीकरणाचा शुभारंभ


बालकांचे आरोग्य चांगले तर कुटूंब हसते-खेळते राहते - महापौर रोहिणी शेंडगे     नगर - आजची बालके ही देशाचे भविष्य आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने बालकांना होणार्‍या आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी वेळोवेळी लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात येत असतो. हे लसीकरण महत्वाचे असून, मनपाच्यावतीने प्रत्येक आरोग्य केंद्रावर हे लसीकरण होणार आहे, पालकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करुन घ्यावे. बालकांचे आरोग्य चांगले असेल तर कुटूंबही हसते खेळते राहते. त्यासाठी मनपाच्यावतीने नागरिकांना मुलभुत सुविधांबरोबरच आरोग्यबाबतही जागृत राहून विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवते, असे प्रतिपादन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी केले.


     महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने एक वर्षाआतील बालकांना न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन लसीकरणाचा शुभारंभ जिजामाता आरोग्य केंद्रात महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, माजी नगरसेवक संजय चोपडा, आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजुरकर, डॉ.आयशा शेख, डॉ.आरती ढापसे, के.एस.खिलारी, चेतन आगरवाल आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, आज गुरुपौर्णिमेनिमित्त लसीकरणाचा शुभारंभ केला आहे. प्रत्येक बालकांची आई प्रथम गुरु असल्याने ही भेट आहे. मनपाच्या सर्वच आरोग्य केंद्रावरील कर्मचारी हे चांगल्या पद्धतीने काम करत असून, कोरोना काळात त्यांनी चांगली सेवा देऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे. परंतु काही अपप्रवृत्ती हे या कर्मचार्‍यांवर आरोप करत आहे, ही चुकीची बाब आहे. सर्वांना लस देण्यासाठी मनपा कटीबद्ध आहे. उपलब्ध लसीच्या साठ्यानुसारच लस दिली जात आहे. पुढील काळात हा लसीचा कोटा वाढवून घेऊन सर्वांना लस देऊ, असे सांगितले.


     याप्रसंगी डॉ.सतीश राजुरकर म्हणाले, केंद्र शासनाने न्युमोकोकल न्युमोनिया आणि इतर न्युमोकोकल आजारापासून संरक्षण व्हावे, यासाठी एक वर्षाच्या आतील बालकांसाठी नियमित लसीकरण मोहिमेंअंतर्गत एक नवीन लस न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) समाविष्ठ करण्यात आली आहे. यामुळे बालकांना न्यूमोनिया संदर्भातील आजारांवर प्रभावी ठरणार आहेत. या लसीचे तीन डोस असून, मातांनी आपल्या बालकांचे लसीकरण करावे, असे आवाहन केले.     


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.के.खिलारी यांनी केले तर आभार डॉ.आरती ढापसे यांनी मानले. याप्रसंगी सिस्टर नवगिरे, पी.आर.रजपुत, एस.एस.शेलार, एस.बी.पटेकर, एम.पी.साळवे, आरोग्य केंद्रातील कर्मचारीवृंद उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post