मोदी सरकारमध्ये बांग्लादेशी व्यक्तीला मंत्रीपद ! चौकशीची मागणी

मोदी सरकारमध्ये बांग्लादेशी व्यक्तीला मंत्रीपद! चौकशीची मागणी नवी दिल्ली - मोदी सरकारमध्ये एका बांगलादेशी व्यक्तीला मंत्रिपद देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार आणि आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिपून बोरा यांनी केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्यावर ते बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप केला आहे. रिपून बोरा यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र प्रामाणिक यांच्या निकटवर्तीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. रिपून बोरा यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेले पत्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. त्यांनी काही वृत्तवाहिन्या आणि संकेतस्थळांवरील वृत्ताचा दाखला देत निसिथ प्रामाणिक यांच्यावर ते बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप केला आहे. ते लिहितात की, निसिथ प्रामाणिक यांचे जन्मस्थान हरिनाथपूर आहे. ते बांगलादेशमधील गैयबंधा जिल्ह्यात आहे. ते संगणकाचे शिक्षण घेण्यासाठी भारतात आले होते. संगणक विषयात पदवी घेतल्यानंतर ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करून खासदारकी मिळवली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post