मुंडे समर्थकांची नाराजी कायम...शुभेच्छांच्या बॅनरवर भाजप नेत्यांचा फोटो नाही...

मुंडे समर्थकांची नाराजी कायम...शुभेच्छांच्या बॅनरवर भाजप नेत्यांचा फोटो नाही...

 


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा 26 जुलैला वाढदिवस आहे. त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो पाहायला मिळत नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.  खुद्द पंकजा मुंडे यांनी वरळी इथल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला होता. पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत.. मात्र या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post