निर्बंधांमुळे परमिटरूम चालकांची चांदी, जादा दराने विक्री, रात्री उशिरापर्यंत होते ‘बसण्याची’ सोय

 निर्बंधांमुळे परमिटरूम चालकांची चांदी, जादा दराने विक्री, रात्री उशिरापर्यंत होते ‘बसण्याची’ सोयनगर : नगर जिल्ह्यात करोना पुन्हा डोके वर काढत असताना करोना नियमावलीची एैशीतैशी सुरू आहे. राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 नंतर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊनही सुरू आहे. परंतु, नगर शहरात या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. विशेषत: हॉटेल, परमिट रूमचालकांनी हे नियम धाब्यावर बसवले आहेत. हॉटेल, परमिटरूम चालकांना फक्त पार्सल सेवेची परवानगी असताना रात्री उशिरापर्यंत हॉटेलमधील टेबल फुल असल्याचे दिसून येते. निर्बंधांचा धाक दाखवून अनेक ठिकाणी जादा दराने मद्य विक्री केली जात आहे. परमिट रूमही रात्री उशिरापर्यंत खुल्या ठेवण्यात येत असून 50 टक्के नियमालाही जुमानले जात नाही. नियम सर्वांना समान या तत्त्वाला हरताळ फासली जात असून परमिट रूमला अपवाद का करण्यात येत आहे, असा सवाल विचारण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post