आता कुठे गेला शेतकर्‍यांचा पाणीदार नेता...माजी आ.मुरकुटेंची मंत्री गडाखांवर कडाडून टिका

 जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले- मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा आरोपमुळा धरणातून शेतकऱ्यांसाठी आवर्तन सोडावे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनअहमदनगर प्रतिनिधी - शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नंतर पाऊसाने दडी मारली आहे १५ ते २० दिवसापासून पाऊस गायब झाला असल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळू लागली आहे.शेतकरी आधीच कोरोना महामारीच्या संकटात सापडला असल्याने आर्थिक अडचणीत आहे.शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातुन शेती साठी अवर्तन सोडावे शेतकऱ्यांनच्या हाता तोंडाला आलेले उभी पिके जळून चालली आहे.येत्या आठ दिवसात शेतीसाठीचे आवर्तन सोडावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांना देऊन चर्चा करतांना मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे समवेत रितेश भंडारी,तुळशीराम झगरे,भाऊराव नगरे,अमित गटने आदी उपस्थित होते.
            जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. पालकमंत्री व जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले,मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात मी आमदार असताना मुळा धरणातून वेळेवर शेतकऱ्यांसाठी आवर्तन सोडली होती तरीसुद्धा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी यांनी रस्त्यावर उतरून स्टंटबाजी करत आंदोलन केले होते. आता तर ते राज्याच्या सरकार मध्ये जलसंधारण मंत्री आहेत आता कुठे गेला शेतकऱ्यांनचा पाणीदार नेता. नेवासा तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली आहे,मतदार संघात ते दिसत नाही शेतकऱ्यांच्या व्यथा मुंबईमध्ये राहून कळत नसतात त्यासाठी मतदार संघात शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागतो परंतु मंत्रीमहोदय मुंबई येथे एसी मध्ये बसून राहतात,शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना आता विसर पडला आहे असा आरोप मा.आमदार.बाळासाहेब मुरकुटे यांनी केला. येत्या आठ दिवसांमध्ये मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी माजी आमदार मुरकुटे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post