नाराज पंकजाताई भाजप सोडणार? पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले...

पंकजाताई या शेवटच्या श्वासापर्यंत पक्षात राहतील  - सुधीर मुनगंटीवार नागपूर : नुकतेच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले होते. पंकजा मुंडे दुसरा पर्याय स्वीकारणार का? अशाही चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर पंकजा मुंडेंनी स्वतःची भूमिका जाहीर केली होती. आता त्यावरच भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार  यांनी भाष्य केले आहे.

आमच्या पक्षात हजारो लोक आहेत जे आमच्यापेक्षा कार्यक्षम आहेत. देवेंद्र फडणवीसांपेक्षा कार्यक्षम आहेत. आमच्यापेक्षा लायक पात्र लोक खाली बसलेले असतात. त्यामुळे मला अजूनही वाटतं की, पंकजाताई या शेवटच्या श्वासापर्यंत पक्षात राहतील. मात्र, पुढच्या जन्मी देखील त्या भाजपच्याच सदस्य असतील, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post