पंकजा मुंडे तातडीने दिल्लीत दाखल, पक्षाध्यक्ष नड्डा यांची भेट घेणार

पंकजा मुंडे तातडीने दिल्लीत दाखल, पक्षाध्यक्ष नड्डा यांची भेट घेणार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला असला तरी समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाही तर समर्थक नाराज असल्याची भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होणंही योग्य असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान राज्यात समर्थकांचं राजीनामासत्र सुरु असतानाच पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या आहेत. यावेळी त्या भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.  कालपासून भाजपमधील अनेक मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांनी येत्या मंगळवारी मुंबईत या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली. वरळी येथील कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंकजा मुंडे आपल्या समर्थकांची समजूत काढणार की काही वेगळाच निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post