शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

 शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळनवी दिल्ली : शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट झाली. जवळपास 57 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. राजधानी दिल्लीत आज सकाळी साडेदहाच्या सुमारास साऊथ ब्लॉकमधल्या पंतप्रधान कार्यालयात दोघांची भेट झाली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उत आला नसता तरच नवल. 

पवार आणि मोदी याआधी भेटले ते नोव्हेंबर 2019 मध्ये ज्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या स्थापनेच्या घडामोडी सुरु होत्या. त्यावेळी संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात दोघांची भेट झाली होती. त्यानंतर सतरा- अठरा महिन्यानंतर दोघांमध्ये ही भेट झाली आहे. भेटीचा तपशील अजून गुलदस्त्यात असला तरी सहकार आणि बँकिंगसंदर्भातल्या प्रश्नांवर ही चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्यासंदर्भातलं एक सहा पानी पत्रही पवारांनी आज मोदींना दिलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post