सोशल मिडियावरील ‘लाईक्स’साठी स्वत:च्या मुलासोबतच ‘हॉट फोटो’...

सोशल मिडियावरील ‘लाईक्स’साठी स्वत:च्या मुलासोबतच ‘हॉट फोटो’, 

महिला आयोगाने घेतली गंभीर दखल  
नवी दिल्ली -महिलेनं चक्क आपल्या अल्पवयीन मुलासोबतच हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावरुन, दिल्ली  महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या महिलेला नोटीस जारी केली आहे. 

महिलेने केवळ सोशल मीडियावर लाईक्स मिळावे, चर्चा व्हावी यासाठी आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासली आहे. आपले फॉर्लवर्स वाढविण्यासाठी या महिलेनं केलेला तमाशा नेटीझन्सला अजिबात आवडला नाही. अनेकांनी या महिलेला ट्रोल केलंय. तर, महिला आयोगाने या महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी संबंधित महिला आणि त्यांच्या मुलाचे 4 फोटो ब्लर करुन सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या महिलेला इन्स्टाग्रामवर 1.60 लाख फॉलोवर्स आहेत. या महिलेने काही दिवसांपूर्वी आपल्या मुलासोबत अश्लील गाण्यावर डान्स केलाचा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, टीका झाल्यानंतर तो व्हिडिओ डिलिट केला आहे. स्वाती माहिवाल यांनी या महिलेची ओळख सांगितली नाही. पण, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे सांगितले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post