भयंकर....दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू


भयंकर....दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू  रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत शुक्रवारी दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेला आठवडाभर संततधार पाऊस पडत आहे. त्यात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक झाला आहे. या मुसळधार पावसामुळे पोसरे येथील बौद्धवाडीवर दरड कोसळली. १२ घरांना त्याचा फटका बसला. त्यातील ६ घरे पूर्णपणे गाडली गेली आहेत. त्यात १७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. २५ जनावरेही दरडीखाली गाडली गेली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post