यंदाच्या मोसमात नगर तालुक्यातील 'या' गावात सुमारे १५०० एकर शिवार जलयुक्तमय

 सुमारे १५०० एकर शिवार जलयुक्तमय - मनोज कोकाटेगतिमान पाणलोट योजनेअंतर्गत चिचोंडी पाटील गावामध्ये झालेल्या ४२ लक्ष रुपयांच्या कामांमुळे सुमारे १५०० एकर शिवार जलयुक्तमय झाले असल्याची माहिती गावचे सरपंच तथा नगर तालुका भाजपचे अध्यक्ष मनोज कोकाटे यांनी दिली.


यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, गेल्या पंचवार्षिक भाजप सरकारच्या काळात पाठपुरावा करून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चिचोंडी पाटील गावात भरीव कामे मंजूर करून घेऊन सुमारे २५०० एकर क्षेत्र पाणलोटाखाली आणलेले होते. गावातील उर्वरित क्षेत्र देखील पाणलोटाखाली यावे अशी प्रबळ इच्छा सदर क्षेत्रातील शेतकऱ्यांची होती. त्याचाच पाठवपुरावठा करून गतवर्षी सुरू झालेल्या गतिमान पाणलोट योजनेअंतर्गत गावासाठी ४२ लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर करून घेतला व सदर निधीतून आणखी १५०० एकर क्षेत्र यावर्षी पाणलोटाखाली आलेले असून एकूण ५००० एकर शिवार आता पाणलोटाखाली आलेले असल्याचे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.


उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कृषी सहायक व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मंजुरी नंतर अवघ्या दोन महिन्यात सदर कामे होऊ शकली. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण झाल्यामुळे पाणी जिरण्याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला. गावातील उर्वरित क्षेत्र देखील पाणलोटाखाली आणण्यासाठी आपण ग्रामस्थांच्या वतीने पाठवपुरावठा करणार असल्याचे यावेळी सरपंच कोकाटे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post