नगर तालुक्यातील ‘या’ हॉटेलवर पोलिसांचा छापा, परप्रांतीय मुलींची सुटका, बापलेकावर गुन्हा

 नगर तालुक्यातील हॉटेलवर पोलिसांचा छापा, परप्रांतीय मुलींची सुटका, बापलेकावर गुन्हानगर  :- नगर तालुक्यातील खंडाळा शिवारात असलेल्या हॉटेल राजयोग येथील कुंटणखाण्यावर छापा टाकून पोलिसांनी तीन परप्रांतीय मुलींची सुटका केली आहे. नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांना नगर तालुक्यातील खंडाळा गावाच्या शिवारात नगर- दौंड रस्त्यावर हॉटेल राजयोगमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, दिलीप बोडके यांच्या पथकाने छापा टाकला असताना तिथे तीन परप्रांतीय मुली मिळून आल्या. याप्रकरणी हॉटेल मालक अनिल माणीकराव कर्डीले (वय 52) व अक्षय अनिल कर्डीले (वय 25. दोघे रा  खंडाळा ता.जि.अ.नगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात आठ हजार 500 रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post