केंद्रप्रमुख संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सुर्यभान काळे यांची नियुक्ती

 केंद्रप्रमुख संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सुर्यभान काळे यांची नियुक्ती नगर - राज्यस्तरावर शिक्षकांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या शिक्षक भारती या संघटनेच्या केंद्रप्रमुख विभागाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी केंद्रप्रमुख सुर्यभान काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण मडके यांनी याबाबत नियुक्तीचे पत्र काळे यांना दिले आहे.

या नियुक्ती पत्रात म्हंटले आहे की, राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीची संघटना बांधणी, शिक्षक भारतीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी शिक्षक समता, प्रतिष्ठा, संधी आणि सत्ता प्रत्येकाच्या वाटयाला यावी यासाठी लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समतावादी आणि विज्ञानभिमुख समाज रचनेसाठी आपली या पदावर नियुक्ती करण्यात येत असून संघटनेमार्फत विविध उपक्रम राबवून त्या विविध उपक्रमाची माहिती शिक्षक भारतीच्या कार्यालयास कळविण्यात यावी.  असे राज्याध्यक्ष अरुण मडके यांनी म्हंटले आहे. केंद्रप्रमुख सुर्यभान काळे यांनी यापूर्वी प्राथमिक शिक्षक संघटनेत विविध पदांवर काम केलेले असून शिक्षक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post