नगर तालुक्यातील २२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 २२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्यानगर- अज्ञात कारणातून आलेल्या नैराश्यामुळे २२ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी घडली.


संकेत बाळासाहेब काळे (वय २२, रा.खडकी रोड, सारोळा कासार) असे या मयत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (दि.१६) त्याचे आई-वडील व घरातील इतर कुटुंबिय शेतात कामासाठी गेलेले असताना सायंकाळी 5 च्या सुमारास त्याने घरातील छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घराबाहेर बसलेल्या त्याच्या वृद्धा आजीच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तिने आरडाओरडा करुन शेजार्‍यांना बोलविले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. नगर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप बोडखे, पो.कॉ. राजेंद्र ससाणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गावातील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


मयत संकेत याच्या पश्चात आई-वडील, 1 भाऊ, आजी-आजोबा असा परिवार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post