महाराष्ट्रात ईडी सारखी संस्था काम करतेय हे दुर्दैव - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

  महाराष्ट्रात  ईडी सारखी संस्था काम करतेय हे दुर्दैव -  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसोलापूर : स्वायत्त संस्था असलेली ईडी भाजपच्या चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्याने वागते हे निष्पन्न झालं आहे. विरोधी पक्षांशी सल्लामसलत करुन महाराष्ट्रात ईडी सारखी संस्था काम करतेय हे दुर्दैव असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ते सोलापुरातील पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीच्या माध्यमातून लक्ष्य केलं जात आहे ते विरोधी पक्षाच्या सांगण्यावरुन होतंय असा आरोप जयंत पाटील यांनी भाजपवर केला. सोलापुरातील एमआयएमच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्या प्रसंगी ते बोलत होते. 


पवार साहेबांचं सोलापूर जिल्ह्यावर प्रचंड प्रेम आहे, इथल्या अनेक विषयांत ते स्वतः लक्ष देतात असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post