घरजावई होण्यास नकार दिल्यामुळे पूर्ण कुटुंबावर बहिष्कार

 घरजावई होण्यास नकार दिल्यामुळे पूर्ण कुटुंबावर बहिष्कार, जात पंचायतीच्या 6 जणांना अटकपुणे : जात पंचायतीच्या माध्यमातून कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केल्याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडला असून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. इचलकरंजी येथील सुशांत नगरक यांनी हा गुन्हा दाखल केला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार सुशांत नगरक यांचे 21-11-2019 रोजी कंजारभट समाजातील मुलीशी हिंदू पद्धतीने लग्न झाले होते. त्यानंतर सुशांत यांनी त्यांची पत्नी गरोदर राहिल्यानंतर तिला माहेरी पाठवले. मार्च महिन्यात सुशांत यांच्या सासरच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पत्निला पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील घरी आणले. त्यानंतर वारंवार विनंती करुनही सुशांत यांच्या पत्नीला त्यांच्या सासरचे लोक परत पाठवत नव्हते. याच गोष्टीमुळे शेवटी सुशांत यांनी त्यांच्या सासरच्या मंडळींकडे विचारणा केली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी सुशांत यांना घरजावई होण्याची गळ घातली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post