नाशिक -पंढरपूर कोरोना जनजागृती सायकल रॅली चे नगर मध्ये स्वागत

 नाशिक -पंढरपूर कोरोना जनजागृती सायकल रॅली चे नगर मध्ये स्वागत 



नगर -नाशिक वरून पंढरपूर कडे जाणाऱ्या कोरोना जनजागृती सायकल रॅली चे स्वागत मा. महापौर भगवान फुलसौदर व महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन चे संचालक राजेंद्र उदागे यांचे हस्ते करण्यात आले या वेळी फटाका व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, पत्रकार संदीप रोडे व सचिन महाशिकारे उपस्थित होते.

स्वागतावेळी बोलतांना मा. महापौर भगवान फुलसौन्दर म्हणाले सध्याच्या परिस्तिथी मध्ये कोरोना बाबत जनजागृती करणे ही काळाची गरज असून आपण सर्वजण व्यापारी असून देखील सामाजिक बांधिलकीची जाणीव आपल्याला आहे या बाबत आपले मी मनापासून अभिनंदन करतो.

      सदर सायकल रॅली ही नाशिक वरून निघाली असून पहिले मुक्काम अहमदनगर येथील कोहिनुर मंगल कार्यालय येथे केले असून एका दिवशी 165 कि. मी. सायकलिंग केले असून दुसरे मुक्काम टेम्भूर्णी येथे असून तिसरे दिवशी पंढरपूर येथे दर्शन करण्यात येईल अशी माहिती नाशिक जिल्हा लॉन असोसिएशन चे अध्यक्ष संदीप काकड यांनी दिली. सदर रॅली मध्ये डॉक्टर, इंजिनियर व व्यापारी असे सर्व वर्गातील असून रॅली मध्ये सर्वस्वी रत्नाकर  भांबरे, डॉ. जयराम डिकले, भास्कर सोनवणे, विक्रम खैरनार असे एकूण 20 ते 25 सायकल स्वारांनी भाग घेतला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post