जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारला सादर,एक हजार कामांची चौकशी होणार

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारला सादर, जवळपास एक हजार कामांची चौकशी होणार मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म हत्वकांशी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. तसेच कॅगनेही यावर ठपका ठेवला होता. याच अनुषंगाने ठाकरे सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केलाय. या अहवालानुसार जवळपास एक हजार कामांची खुली चौकशी केली जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या एक हजार कामांची चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यापैकी तब्बल 900 कामांची अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी होणार आहे, तर उर्वरित 100 कामांची विभागीय चौकशी होणार आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजना ओळखली जाते. मात्र या योजनेच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा सुरू झालाय. फडणवीस सरकारच्या योजनेच्या चौकशी करण्यासाठी ठाकरे सरकारने चार सदस्यीय समिती गठीत केली होती आणि या समितीचा अहवाल राज्य सरकारला आता सादर झालाय.

राज्याच्या अनेक भागांमध्ये पाण्याची भीषण टंचाई पाहता तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गाजावाजा करत जलयुक्त शिवार योजना प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर अर्थात 26 जानेवारी 2015 मध्ये राज्यात लॉन्च केली. या योजनेमुळे राज्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटेल अशा वारंवार वल्गना झालेल्या पाहायला मिळाल्या. एवढेच नाही तर या योजनेतील काही कामांचा गौरव म्हणून अनेकांना पारितोषिकही देण्यात आली. मात्र हीच योजना आता चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेली पाहायला मिळते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post