कॉंग्रेसला धक्का...पक्षाचे 8 आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत

 कॉंग्रेसला धक्का...पक्षाचे 8 आमदार भाजपात जाण्याच्या तयारीतइंफाळ - पूर्वोत्तर राज्यांमधील मणिपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, एनएआयने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी पक्षामधील किमान आठ आमदार हे भाजपामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर काँग्रेसचे मणिपूरमधील प्रदेशाध्यक्ष गोविंदास कॉन्थोजम यांनीही राजीनामा दिला आहे. मणिपूरमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच पक्षात मोठी फूट पडल्याने काँग्रेससमोरील आव्हान वाढले आहे. काँग्रेसचे मणिपूरमधील प्रदेशाध्यक्ष गोविंदास कॉन्थोजम यांनी पदाचा राजीनामा देत पक्षाच्या अडचणीत अधिकच भर घातली आहे. कॉन्थोजम हे विष्णूपूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आले होते. त्यांना डिसेंबर २०२० मध्ये मणिपूरचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले होते. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आमदार भाजपात दाखल झाल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पारडे जड होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post