आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेचे ग्रुपचे वेळापत्रक जाहीर ,भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने

 आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे ग्रुपचे वेळापत्रक जाहीर मुंबई : बहुप्रतिक्षित आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाबाबत  एक मोठी माहिती समोर आली आहे. आधी भारतात खेळवण्यात येणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान ही युएई आणि ओमन या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. या भव्य स्पर्धेतील गट आयसीसीन नुकतेच जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या भारत आणि पाकिस्तान  यांच्या जागेबाबतही सर्व स्पष्ट झाले आहे. या दोन्ही संघाच्या चाहत्यांसह विश्व क्रिकेट वाट पाहत असलेल्या या सर्वात कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत आता सर्वांनाच पाहता येणार आहे.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ ग्रुप-1 मध्ये आहेत. या संघामध्ये सामने कधी आणि कसे होणार याबाबत पुढील आठवड्यात सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टी-20 विश्वचषकात रंगणार सुपर 12 चा थरार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने  शुक्रवारी (16 जुलै)  टी-20 विश्व चषकात होणाऱ्या सामन्यांबाबत मोठी माहिती दिली. या माहितीनुसार 12 संघामध्ये रंगणाऱ्या विश्वचषकाच्या थरारात सुपर 12 स्टेजमध्ये  ग्रुप 1 मध्ये 6 आणि ग्रुप 2 मध्ये 6 संघ आपआपसांत भिडणार आहेत. ज्यामध्ये दोन्ही गटात प्रत्येकी 4 संघ आधीच निवडले असून इतर चार संघ हे दोन ग्रुप स्टेजेसच्या सामन्यांतून क्वॉलीफाय होऊन स्पर्धेत एन्ट्री घेणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये ग्रपु A मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नाम्बिया आणि नेदरलँड हे संघ आहेत. तर ग्रुप B मध्ये बांग्लादेश, स्कॉटलँड, ओमन आणि पापुआ न्यू गिनी हे संघ आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post