धक्कादायक..आरोग्य अधिकार्‍याची आरोग्य उपकेंद्रात गळफास घेवून आत्महत्या

धक्कादायक..आरोग्य अधिकार्‍याची आरोग्य उपकेंद्रात गळफास घेवून आत्महत्यानगर : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश शेळके (वय ४५) यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. 


डॉ. गणेश शेळके हे करंजी येथील आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते बहिरवाडी (ता. नेवासा) येथील रहिवासी होत. मंगळवारी करंजी येथील उपकेंद्रात कोविड लसीकरण सुरु होते. त्यावेळी डॉ. शेळके हे तणावाखालीच असल्याचे जाणवत होते. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना एक कागद व पेन मागितला  व उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा दरवाजा आतून बंद करुन घेतला. बराचवेळ झाला तरी दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून कर्मचाऱ्यांनी शेळके यांना आवाज दिला. तरीही त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा सुरु केला. अखेरीस दरवाजा तोडून आत पाहिले असता डॉ. शेळके यांनी फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्य वाघ, अरविंद चव्हाण, सतिष खोमणे, भाऊसाहेब तांबे हे घटनास्थळी दाखल झाले.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post