प्राथमिक शाळा काळेवस्ती येथे विद्यार्थ्यांसाठी घरोघरी शाळा उपक्रमाचे उद्घाटन

 प्राथमिक शाळा काळेवस्ती येथे विद्यार्थ्यांसाठी घरोघरी शाळा उपक्रमाचे उद्घाटन.


कोविड-१९ च्या प्रादुर्भावामूळे शिक्षिका वृषाली घोडके यांचा अभिनव उपक्रम अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळे वस्ती, ता. नेवासा येथे सुरू असलेल्या घरोघरी शाळा या अभिनव उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेली कु. तन्वी दत्तात्रय काळे  या विद्यार्थिनीच्या  घरातच तिच्यासाठी तयार केलेल्या स्वतंत्र शाळेचे उद्घाटन पंचायत समिती नेवासा येथील शिक्षण विस्तार अधिकारी विद्यादेवी सुंबे  यांच्या शुभहस्ते व भानस हिवरे केंद्राचे केंद्रप्रमुख गोपीनाथ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. 


कोविड-१९ च्या काळात १०० टक्के विद्यार्थ्यांचे  शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवस्तीने प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून , प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्याचा स्वतंत्र संचाचे मोफत वाटप केले आहे . तसेच नियमित गृहभेटीद्वारे घरोघरी शाळा हा अभिनव उपक्रम प्रभावीपणे सुरु केला आहे. सदर उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्वतंत्र शाळांपैकी कु. तन्वी दत्तात्रय काळे या विद्यार्थिनीच्या घरात सदर उद्घाटनाचा सोहळा पार पडला .सदर उद्घाटनासाठी मुलीच्या घरासमोर मंडप टाकण्यात येऊन घरासमोर आकर्षक रांगोळी काढण्याबरोबरच विद्यार्थिनीसाठी तयार केलेल्या शाळेला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती .सुरुवातीला तन्वी काळे या विद्यार्थिनीने सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. 


        शाळेच्या मुख्याध्यापिका  वृषाली घोडके  यांनी उपस्थित मान्यवरांना उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील वडगाव शाळेचे मुख्याध्यापक संजय खरात यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या या उपक्रमामुळे १००% विद्यार्थ्यांचे शिक्षण  प्रभावीपणे सुरू ठेवता येते .तसेच पालक व शिक्षक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांची प्रगती  आनंदाने ,हसत खेळत व गतीने होण्यास मदत होते. सदर उपक्रमास पालक व विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 


सदर उद्घाटनाच्या कार्यक्रमास केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सुनंदा इधाटे , भानसहिवरे गावचे उपसरपंच अय्याज देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मोहिते , वर्षा ठाणगे , योसेफ मकासरे  उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी "घरोघरी शाळा" या उपक्रमाचे  कौतुक केले तसेच काळेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली घोडके  व सहशिक्षिका निता आनंदकर  यांचे हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल खास अभिनंदन केले. व या  उपक्रमास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .


या अभिनव उपक्रमाचे स्वागत नेवासा गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे , विस्तारअधिकारी शिवाजी कराड, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसंघटक राजेंद्र निमसे, राज्य उपाध्यक्ष सुनिल जाधव,जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रणदिवे, माजी केंद्रप्रमुख प्रकाश घोडके आदींनी केले आहे .


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post