नगर जिल्ह्यातील ‘या’तालुक्यात होणार करोनाचे 'जिनोम सिक्वेन्सिंग', मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेश

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात होणार करोनाचे जिनोम सिक्वेन्सिंग, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेशमुंबई,: पॉझिटिव्हिटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांनंतरच्या स्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी बुधवारी आढावा घेतला. यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर तुलनेने कमी होत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. हा दर आणखी कमी करण्यासाठी RTPCR चाचणीची संख्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करून संस्थात्मक उपचाराला गती, लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली. नगर जिल्ह्यात जिनोम सिक्वेन्सिंग करा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदनगर  जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकिय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घ्या, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिला. होमगार्ड नियुक्त्या, फिरती चाचणी केंद्रे आणि इतर आरोग्य सुविधांविषयक मागणीचा ज्या जिल्ह्यांनी उल्लेख केला त्यांच्या मागणीची दखल घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. Genome Sequencing हा एखाद्या विषाणूचा बायोडाटा असतो. एखादा विषाणू कसा दिसतो, कसा आहे याची माहिती या माध्यमातूनच मिळते. याच विषाणूच्या विशाल समूहाला जीनोम म्हटलं जातं. विषाणूबाबत जाणण्याच्या प्रक्रियेला जीनोम सिक्वेन्सिंग म्हणतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post