जुन्या भांडणाचा राग, तरुणावर भर दुपारी गोळीबार

 जुन्या भांडणाचा राग, तरुणावर भर दुपारी गोळीबार, बीड हादरलं! थरार सीसीटीव्हीत कैदबीड : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर भरदुपारी गोळीबार करण्यात आला. मात्र तरुणाचे दैव बलवत्तर असल्याने तसेच त्याने वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारातून त्याचे प्राण वाचले आहेत. संबंधित घटना ही काल (16 जुलै) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. हा सर्व घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर आहे. तिथेच त्याचे बांधकाम साहित्याचे दुकान आहे. दरम्यान काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास या दुकानासमोर पवन गावडे हा थांबला होता. यावेळी याठिकाणी दोन तरुण दुचाकीने आले. यावेळी त्यांनी पवन याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी ‘जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे’, असं म्हणत पवनशी हुज्जत घातली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post