उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण 'या' घडामोडींमुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारली, शिवसेना मंत्र्याचा गौप्यस्फोट

 


उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण घडामोडींमुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारली, शिवसेना मंत्र्याचा गौप्यस्फोटनगर : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची आजिबात इच्छा नव्हती. मात्र, मागील पाच वर्षांत भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेला कटू अनुभव आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करुन मुख्यमंत्री झाल्याचा गौप्यस्फोट मृदा व जससंधारण मंत्री शंकरराव गडाख  यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात नुकताच शिवसंपर्क अभियानाला प्रारंभ झाला आहे. त्यावेळी राज्यमंत्री गडाख बोलत होते.


मंत्री गडाख म्हणाले, इतर राजकीय पक्ष निवडणुका समोर आल्यानंतर शेतकऱ्यांची खोटी कर्जमाफी करतात. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर प्राधान्याने शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सोडविला. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर ते अनेक धडाडीचे निर्णय घेणार होते. परंतु कोरोनाच्या संकटामुळे त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले.

कोरोनाच्या संकटात केंद्रातील सरकारसारख्या थाळ्या राज्य सरकारने वाजविल्या नाहीत. तर प्रमाणिकपणे काम करून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वेळोवेळी जनतेसमोर येऊन कुटूंबातील एका व्यक्तीप्रमाणे मार्गदर्शन करुन जनतेला कोरोनातून सावरले. त्यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे मंत्री गडाख यांनी सांगितले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post