फ्लेक्सबाजीच्या प्रश्नावर अजितदादांचा संताप, म्हणाले...

 फ्लेक्सबाजीच्या प्रश्नावर अजितदादांचा संताप, म्हणाले, 'फ्लेक्स लावायला मी सांगितलं का?पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात  फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. यासंदर्भात विचारलं असता अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की,  फ्लेक्स लावायला मी सांगितलं का? अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितलं का? गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष आहे. चुकीचे होर्डिंग असतील तर पोलिसांनी काढावेत, असं त्यांनी म्हटलं आहे. 


राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात. सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post