मोदी-शहा हेच माझे नेते, पंकजा मुंडेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले....

 


मुंबई :  माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांवर  अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा होती.  मुंडे यांच्या याच भाषणावर  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  प्रतिक्रिया दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं, तुम्ही ते भाषण ऐकलं का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही, असं म्हणत फडणवीसांनीही पंकजांना त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.

पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा ताईंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासे केले आहेत. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही, असं म्हणत ‘पंकजा’ या विषयावर फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post