डॉ.सुजाता ढाकणे यांची समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेवर निवड

 डॉ.सुजाता ढाकणे यांची समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेवर नाशिक विभागीय महिला प्रतिनिधी म्हणून निवडनगर : शेवगाव तालुक्यातील एरंडगाव येथे कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकारी डॉ.सुजाता ढाकणे यांची समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या नाशिक विभागीय महिला प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. डॉ.ढाकणे या कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. करोना काळात त्यांनी आपल्या परिसरात करोना प्रसार रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय ग्रामीण भागात आरोग्य जागृतीसाठी त्या सातत्याने प्रयत्न करीत असतात. या कार्याची दखल घेत त्यांची संघटनेत महिला प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल बोलताना डॉ.ढाकणे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत समुदाय आरोग्य अधिकारी महत्त्वपूर्ण घटक आहे. करोना काळात या अधिकारी वर्गाने अतिशय कर्तव्यदक्षता दाखवित महामारीला तोंड दिले आहे. आमची संघटना अधिकारी वर्गाच्या समस्यांच्या सोडवणूकीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न राहिल. पदाधिकार्‍यांनी आपल्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवत जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविण्याचे काम करू, अशी ग्वाही डॉ.ढाकणे यांनी दिली.

या निवडीबद्दल डॉ.ढाकणे यांचे संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.अमोल रावते, महासचिव अशरफअली शेख, कार्याध्यक्ष डॉ.गणेश शिंदे, डॉ.संग्राम शिंदे, डॉ.रियाझ खान, सचिव संकेत पोटे, अभिषेक नागरगोजे, जिल्हाध्यक्ष डॉ.शैलेश पवार, सचिव अक्षय पठारे, रेणुका रुपटक्के  आदींनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post