एकाच वेळी पाच ठिकाणी छापे, अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त,

 देवळाली प्रवरा येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त,  

एकाच वेळी पाच ठिकाणी छापे एकूण 1,82,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त

 Dy.s.p संदीप मिटके व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त पथकाची कारवाई  आज दि.  09/7/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत  देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने  पोलिसांनी सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील  कच्चे रसायन, 6240  लिटर ,तयार गावठी हातभट्टी दारू 118  लिटर   व तसेच 200   किलो नवसागर  असा एकूण 1,82,950  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात  आले आहे  त्यानुसार,

आशाबाई बाळासाहेब गायकवाड, मयूर अनिल गायकवाड,  सतिश वसंत गायकवाड ,  बापू भास्कर गायकवाड , मंगल बापू गायकवाड,   एक अज्ञात (फरार )  (सर्व राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी)  यांचेविरुध्द  राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

सदरची कारवाई  मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, गणेश पाटील ,पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क  यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p  संदीप मिटके, Dy s.p. नितेश शेंडे ( राज्य उत्पादन शुल्क)पोलीस निरीक्षक  नंदकुमार दुधाळ, व इतर अधिकारी व अंमलदार आदींनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post