आपण जनतेचा विश्वास गमावलाय! मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

 मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी अखेर राजीनामा दिला  



बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी अखेर राजीनामा दिला आहे. “मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेवल्यानंतर राज्यपालांना भेटू” असं त्यांनी कर्नाटक सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सोहळ्यात सांगितलं. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच येडियुरप्पा यांनी पायउतार होण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली होती. “कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे” अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post