मुसळधार पावसामुळे हाहाकार...संपूर्ण शहर पाण्याखाली...नागरिक घरातच अडकले video

मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरात हाहाकार...संपूर्ण शहर पाण्याखाली...नागरिक घरातच अडकले

 


चिपळूण-  कोकणात परिस्थिती चिंताजनक झाली असून अनेक शहरांत पाणी शिरले आहे. चिपळूण शहरात  पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ट नदीला पूर आल्याने संपूर्ण पाणी शहरात शिरले आहे. शहरातली सर्व दुकाने, तसेच घरांत पाणी शिरल्याचं पहायला मिळत आहे.


अनेक घरे पाण्याखाली गेले आहेत. घरे तसेच इमारतींचे तळमजले हे संपूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. चिपळूण शहराला पाण्याचा वेढा पहायला मिळत आहे. चिपळुणात जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत त्यामुळे मदतीचे मार्गही बंद झाले आहेत. 2005 नंतर प्रथमच अशा प्रकारे चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे. नागरिक घरांत अडकून पडले आहेत. शहराचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचा मदतीसाठी आक्रोश सुरू आहे. खासदार विनायक राऊत यांनीही मदतीसाठी नेव्हीला पाचारण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. एनडीआरएफच्या तुकड्याही कोकणात रवाना झाल्या आहेत.

video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post