टोकियो ऑलिम्पिक...भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी

टोकियो ऑलिम्पिक...भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी टोकियो - भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिमधील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. आज शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीयहॉकी संघाने न्यूझीलंडवर ३-२ ने मात केली. भारताकडून हरमनप्रीत सिंगने दोन तर रूपिंदरपाल सिंग याने एक गोल केला. तर सामन्याच्या अखेरच्या क्षणांमध्ये गोलरक्षक श्रीजेश आणि बचाव फळीने केलेला अभेद्य बचाव भारताच्या विजयामध्ये निर्णायक ठरला. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post