भाजपत विरोधी पक्षनेतेपदावरून जोरदार रस्सीखेच...माजी महापौर, माजी सभापती, शहर जिल्हाध्यक्ष इच्छुकनगर : नगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच  आहे. माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र महापौरांकडे मंगळवारी सुपुर्द केले. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी बुधवारी पाठिंब्यासाठी नगरसेवकांच्या सह्यांची मोहीम हाती घेतली.

विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र महापौरांनी भाजपचे नगरसेवक तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिले होते. परंतु, भाजपच्या प्रदेशध्यक्षांनीच ही नियुक्ती थांबविण्याचा आदेश दिला. याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी शुक्रवारी  नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक महेंद्र गंधे, माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, गटनेत्या मालन ढोणे हे चोघे इच्छुक आहेत. मनपातील  घडामोडींमुळे भाजपमधील इच्छुकही सावध झाले. त्यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त करत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. माजी सभापती मनोज कोतकर यांनी बुधवारी पाठिंब्यासाठी नगरसेवकांच्या सह्यांची मोहीम राबविली. अन्य नगरसेवकांशीही ते संपर्क करत आहेत. कोतकर हे राष्ट्रवादीकडून सभापती झाले होते. अवघ्या चार महिन्यांतच त्यांचे पद संपुष्टात आले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post