मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज? पंकजा मुंडेंनी केला मोठा खुलासा

मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज? पंकजा मुंडेंनी केला मोठा खुलासा मुंबई: प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या, असं सांगत पंकजा यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ते योग्यच होतं, असं सूचक विधानही त्यांनी केलं. 

नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही, हे स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं. त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते. त्यामुळे आम्ही मुंबईतच असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही पद द्यायचं असेल तर मुंडे कुटुंबाचं नाव चालतं. त्यामुळे आमचं नाव चाललं. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती, असं पंकजा यांनी स्पष्ट केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post