नगर तालुक्यात मोफत ठिबक संचाचे वाटप..

 फळबागा वाचवण्यासाठी सह्याद्रि फाउंडेशनचा पुढाकार, 

नगर तालुक्यात मोफत ठिबक संचाचे वाटप..नगर- पावसाने ओढ दिल्याने अनेक फळबाग शेतकरी अडचणीत आले आहेत. फळबाग लागवडीसाठी मोठा आर्थिक खर्च असतो, त्यामुळे पावसाने ओढ दिल्याने  चिंतेत पडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्याचे काम सह्याद्री फाउंडेशनच्यावतीने सध्या करण्यात येत आहे. पावसाने ओढ दिलेल्या क्षेत्रातील फळबाग शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचाचे मोफत वाटप करण्यात येत असून तालुक्यातील सारोळा कासार येथील शेतकऱ्यांना या ठिबक सिंचन संचाचे वाटप नुकतेच करण्यात आले. 


सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार लांडे यांच्या हस्ते तसेच संगीतले,संस्थेचे उपाध्यक्ष मोईन शेख,राहुल सप्रे, अक्षय कड़ूस, केतन कड़ूस, स्वप्निल काले,गौरव धामोरे यांच्या उपस्थितीत हे मोफत संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थी शेतकरी रोहित काले इत्यादि उपस्थित होते.


पहिल्या आठवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्यवर नगर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. यात फळबाग पिकवणारे शेतकरी अनेक आहेत. या दरम्यान तसेच फळबाग लागवडी मोठया प्रमाणत झाल्या. नंतर मात्र पावसाने उघडीप दिल्याने नगर तालुक्यातील विविध प्रकारच्या फळबागा वाचवण्यासाठी बळीराजाची मोठी कसरत होत आहे. ही परिस्थिती पाहता सह्याद्री फाउंडेशनच्या तर्फे अशाच काही फलबगा वाचवण्यासाठी पुढाकार सध्या घेण्यात येत आहे. सह्याद्री फाउंडेशन या संस्थे तर्फे नगर तालुक्यातील सारोळा कासार येथिल गरजू शेतकऱ्यांना मोफ़त ठिबक सिंचन संचाचे वाटप करण्यात आले. ग्लोबल वॉर्मिंग मुळे पाऊस बेभरवशचा झाला असून ठिबक सिंचन ही फळबागांसाठी काळाची गरज असून संस्था जलसंधारन तसेच शेती मधील प्रगत तंत्रज्ञान त्याबाबत जनजागृति करत आहे असे सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार लांडे यांनी सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post