आ.रोहित पवार इतरांच्या कामाचेही श्रेय घ्यायला पळतात

 

कर्जत जामखेड मतदारसंघात राजकारण तापले, आ.रोहित पवारांवर सचिन पोटरे यांनी साधला निशाणानगर: काही दिवसांपूर्वी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील विकासकामांवरून आ.रोहीत पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता भाजपचे पदाधिकारी सचिन पोटरे यांनीही आ.पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार खोटं बोलतात पण रेटून बोलतात.कुठल्याही कामाचे श्रेय घ्यायला पुढे पळत आहेत.केंद्र सरकारची, जि. प. ची कामेही मीच केली म्हणतात. कर्जत तालुक्यात खा. सुजय विखे यांनी दरजोन्नीत केलेले 70 की. मी. चे रस्तेही मीच केली असे आ.पवार म्हणतात अशी टीका पोटरे यांनी सोशल मीडियावर केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post