भाजप प्रदेशाध्यक्षांनी नगर शहर जिल्हाध्यक्षांना शिकवला महत्त्वाचा ‘धडा’

 भाजप प्रदेशाध्यक्षांनी नगर शहर जिल्हाध्यक्षांना शिकवला महत्त्वाचा ‘धडा’नगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शुक्रवारी नगर दौर्‍यावर आहेत. आनंदधाम येथे त्यांनी आचार्यश्रींच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यानंतर ते नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असताना पत्रकार आल्याने त्यांनी पत्रकारांशी संवाद सुरु केला. एक दोन प्रश्न झाल्यावर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी आवरते घ्या, पुढे कार्यक्रमाला उशीर होतोय, असे पत्रकारांना सांगितले. पत्रकारांचे प्रश्न बाकी असल्याने चंद्रकांत पाटील यांनी त्याची नोंद घेत गंधे यांना मध्येच थांबवले. पाटील यांनी गंधे यांना पत्रकारांसमोरच एक धडा दिला. ‘पत्रकारांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय कधीही निघायचे नसते’ अशा शब्दात पाटील यांनी गंधे यांना धडा दिला. यानंतर त्यांनी पत्रकारांचे सर्व प्रश्न घेत उत्तरे दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post